मनःपूर्वक पश्चात्तापाचे आवाहन
योएल २:१२-१७
१२
तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.
१३
तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
१४
कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.
१५
सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.
१६
लोकांना एकत्र करा, सभेला पवित्र करा; वडिलजनांना एकत्र आणा, बालकांना आणि स्तनपान करणार्या अर्भकांना देखील एकत्र आणा. वराला त्याच्या निवासस्थानातून आणि वधूला तिच्या खोलीतून बोलवा.
१७
याहवेहसमोर सेवा करणार्या याजकांनी, द्वारमंडप आणि वेदी यांच्यामध्ये रडत उभे राहावे. आणि त्यांनी असे म्हणावे, “हे याहवेह, तुमच्या लोकांना वाचवा, आपल्या वतनाला राष्ट्रांमध्ये अप्रतिष्ठा किंवा चेष्टेचे कारण होऊ देऊ नका. ‘त्यांचा परमेश्वर कुठे आहे?’ असे त्यांनी लोकांमध्ये का म्हणावे.”
Settings