Skip to content
योएल २:१-११

योएल २:१-११

सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—
तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा, मेघांचा व दाट काळोखाचा दिवस. जसे डोंगरावर विस्तारलेल्या पहाटेसारखा आहे तसे विशाल व बलवान सैन्य चालून येत आहे, यापूर्वी असे कधी झाले नव्हते, नंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही.
त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.
त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.
रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.
त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात; हे प्रत्येक चेहरा फिका पडतो.
वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.
ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत; प्रत्येकजण सरळ पुढे जातो. समोर शस्त्रे असताना ते जखमी न होता रांग न मोडता त्यातून पार जातात.
शहराकडे ते धाव घेतात; ते तटाच्या भिंतीवर धावतात; ते चढून घरात शिरतात, जणू काही खिडक्यांतून प्रवेश करणारे चोरच!
१०
पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.
११
याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options