Skip to content
इय्योब ३९:९-२५

इय्योब ३९:९-२५

९
“रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय? रात्रीच्या वेळी तो तुझ्या गोठ्यात राहील काय?
१०
त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय?
११
त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय? तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय?
१२
खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय?
१३
“जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.
१४
ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,
१५
एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.
१६
ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही,
१७
कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.
१८
परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.
१९
“घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय?
२०
टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात?
२१
ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो.
२२
तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; तलवारीपासून तो मागे हटत नाही.
२३
त्याच्या पाठीवर असलेला भाता; व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते.
२४
तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.
२५
तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, दुरूनच तो लढाईचा वास घेतो, मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.