मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३०:९-१५

उपहास व अपमान सहन करणे

इय्योब ३०:९-१५
“आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात; मी त्यांच्या चर्चेचा विषय झालो आहे.
१०
ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात; माझ्या तोंडावर थुंकण्यास ते संकोच करीत नाहीत.
११
आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे, माझ्यासमोर ते अनियंत्रितपणे वागतात.
१२
माझ्या उजव्या बाजूने घोळक्‍याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात; आणि माझ्या वाटेवर जाळे पसरवितात, माझ्याविरुद्ध ते उतरणी बांधतात.
१३
ते माझा मार्ग अडवितात; माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. ते म्हणतात, ‘याला साहाय्य करणारा कोणीही नाही.’
१४
खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात; माझा नाश करण्यासाठी भग्नावशेषातून ते माझ्यावर लोंढ्यासारखे धावून येतात.
१५
भयाने मला ग्रासून टाकले आहे; माझा मान सन्मान वार्‍याप्रमाणे नष्ट झाला आहे, आणि माझी सुरक्षा ढगाप्रमाणे सरून गेली आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options