Skip to content
इय्योब १६:६-१४

इय्योब १६:६-१४

“परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही; आणि जरी मी गप्प राहिलो तरी ते जात नाही.
खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे; तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे.
तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत. माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते.
परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, आणि माझ्यावर दात खातात; माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत.
१०
ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात; तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात. आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात.
११
परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.
१२
मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे;
१३
त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. दया विरहित ते माझी आतडी छेदतात आणि माझे पित्त भूमीवर ओततात.
१४
पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options