इय्योब १६:१७-२२
१७
तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.
१८
“अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझे रुदन कधीही विश्रांती न पावो!
१९
तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे; माझा कैवारी उच्चस्थानी आहे.
२०
माझा मध्यस्थ माझा मित्र आहे आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात;
२१
एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो.
२२
“केवळ काही वर्षे निघून जातील आणि फिरून परत येत नाही त्या वाटेने मी रवाना होईल.
Settings