Skip to content
यशायाह ४१:८-२०

यशायाह ४१:८-२०

“परंतु हे इस्राएल, माझे सेवक, याकोब, माझे निवडलेले, कारण तुम्ही माझा मित्र अब्राहामाचे वंशज आहात,
पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे, तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे. मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’; मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही.
१०
भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.
११
“पाहा, जे तुमच्यावर चवताळले, ते निश्चितच लज्जित व अपमानित होतील; ज्यांनी तुम्हाला विरोध केला ते नाहीसे होऊन नाश पावतील.
१२
तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल, पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात त्यांचे अस्तित्वच राहणार नाही.
१३
कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन.
१४
हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,
१५
“पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.
१६
तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.
१७
“गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.
१८
ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.
१९
मी वाळवंटात देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. गंधसरूची झाडे माळरानात लावेन, चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन.
२०
जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील, ते विचार करतील व त्यांना समजेल, याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options