मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती ४३:२६-३४

योसेफाची बन्यामीनशी भेट; मेजवानी

उत्पत्ती ४३:२६-३४
२६
योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या.
२७
त्याने त्यांना अभिवादन केले, मग त्याने विचारले, “त्या वृद्ध माणसाविषयी तुम्ही बोलला, ते तुमचे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत काय?”
२८
“होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.
२९
त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.”
३०
नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.
३१
मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.”
३२
योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.
३३
प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.
३४
योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options