उत्पत्ती २४:६१-६७
६१
नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.
६२
दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता.
६३
एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले.
६४
रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली
६५
आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?” “ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले.
६६
आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.
६७
मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.
Settings