उत्पत्ती २४:५४-६१
५४
यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे परत जाण्यास मला निरोप द्या.”
५५
परंतु तिची आई व भाऊही म्हणाला, “मुलीने आमच्याजवळ कमीतकमी दहा दिवस राहावे अशी आमची इच्छा आहे; नंतर तुम्ही जावे.”
५६
पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.”
५७
तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून विचारतो”
५८
त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.”
५९
तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली.
६०
एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”
६१
नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.
Settings