Skip to content
गलातीकरांस ६:११-१७

पौलाचे अंतिम आवाहन आणि इशारा

गलातीकरांस ६:११-१७
११
मी स्वतःच्याच हाताने मोठ्या अक्षरांनी तुम्हाला लिहित आहे!
१२
जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा.
१३
ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल.
१४
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे.
१५
सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्त्वाचे आहे.
१६
जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.
१७
येथून पुढे मला कोणी त्रास देऊ नये, कारण माझ्या शरीरावर मी येशूंची चिन्हे वागवितो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options