Skip to content
गलातीकरांस ४:६

गलातीकरांस ४:६

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ६ दाखवत आहे.
३
जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो.
४
परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.
५
जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.
६
कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”
७
आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.
८
तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता.
९
पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता?

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.