गलातीकरांस ४:१-७
१
आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही.
२
पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते.
३
जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो.
४
परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.
५
जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.
६
कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”
७
आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.
Settings