Skip to content
एज्रा ५:२-१२

एज्रा ५:२-१२

२
मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.
३
परंतु फरातच्या पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”
४
त्यांनी हे देखील विचारले, “मंदिर बांधण्याचे काम करणार्‍या सर्व लोकांची नावे काय आहेत?”
५
पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.
६
फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता:
७
त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: दारयावेश महाराज, आपणास आमच्या शुभेच्छा!
८
आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे.
९
आम्ही पुढार्‍यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”
१०
आम्ही त्यांची नांवे विचारली, कारण आम्ही त्यांच्या पुढाऱ्यांची नावे लिहून तुमच्या माहिती करिता तुम्हास कळवावी.
११
त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत.
१२
कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options