Skip to content
एज्रा ३:८-११

एज्रा ३:८-११

इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.
परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते.
१०
बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.
११
त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options