आनंद आणि दुःख यांचे मिश्रण
एज्रा ३:१२-१३
१२
पण वयस्कर याजक, लेवी, व इतर पुढारी यातील पुष्कळजण, ज्या लोकांनी पूर्वीचे मंदिर बघितले होते ते शलोमोनाने बांधलेल्या सुंदर मंदिराची आठवण काढून एकीकडे मोठ्याने रडू लागले, तर दुसरीकडे त्यांच्यापैकी काही मोठ्या आनंदाने जयघोष करू लागले.
१३
लोक इतक्या मोठ्याने जयघोष करीत होते की त्यांचा आवाज दूर अंतरावरूनही ऐकू येत होता आणि त्यामुळे रडण्याचा आवाज व आनंदाचा आवाज यातील फरक लोकांना समजत नव्हता.
Settings