Skip to content
एज्रा ४:१-५

एज्रा ४:१-५

बंदिवासातून परत आलेले लोक याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधत आहेत, हे जेव्हा यहूदाह व बिन्यामीनच्या शत्रूंनी ऐकले,
तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.”
पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”
नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी अधिकार्‍यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options