Skip to content
यहेज्केल ३:२२-२७

संदेष्ट्याला बंदिस्त करून गप्प केले

यहेज्केल ३:२२-२७
२२
त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.”
२३
तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो.
२४
नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे.
२५
आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्‍यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल.
२६
तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत.
२७
परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options