मुख्य सामग्री पर जाएँ
निर्गम १९:९-१५

पवित्रीकरण आणि सीमांबद्दल आज्ञा

निर्गम १९:९-१५
मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले.
१०
आणि याहवेह मोशेला म्हणाले, “लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे,
११
आणि तिसर्‍या दिवशी तयार असावे, कारण त्या दिवशी याहवेह सर्व लोकांसमक्ष सीनाय पर्वतावर उतरून येतील.
१२
लोकांसाठी पर्वताच्या सभोवती सीमारेषा आख आणि त्यांना सांग, ‘कोणीही पर्वताकडे जाऊ नये किंवा त्याच्या पायथ्यालाही कोणी स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कोणी पर्वताला हात लावतील त्यांना मारून टाकावे.’
१३
त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”
१४
मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले.
१५
मग तो लोकांना म्हणाला, “तिसर्‍या दिवसासाठी आपली तयारी करा, लैंगिक संभोगापासून दूर राहा.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options