Skip to content
निर्गम १९:३-८

देव कराराचा प्रस्ताव ठेवतो

निर्गम १९:३-८
३
नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे:
४
‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे.
५
आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे,
६
तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”
७
तेव्हा मोशेने इस्राएली पुढार्‍यांना बोलावून ज्यागोष्टी याहवेहने सांगाव्या म्हणून आज्ञापिल्या होत्या, त्या त्यांना सांगितल्या.
८
तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options