मुख्य मजकुरावर जा
अनुवाद ३१:१-८

मोशे इस्राएलला धीर देतो व उत्तराधिकारी नेमतो

अनुवाद ३१:१-८
मोशेने या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना जाऊन सांगितल्या:
“मी आता एकशेवीस वर्षांचा झालो आहे आणि मी येथून पुढे तुमचे नेतृत्व करू शकणार नाही. कारण ‘तू यार्देन नदी ओलांडू नये,’ असे याहवेहने मला सांगितले आहे.
परंतु याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच तुमच्या आधी यार्देन नदी ओलांडतील. ते या राष्ट्रांचा तुमच्यापुढे नाश करतील आणि तुम्ही त्यांच्या भूमीचा ताबा घ्याल. याहवेहने म्हटल्याप्रमाणे यहोशुआ देखील यार्देन नदी ओलांडून तुमच्यापुढे जाईल.
आणि ज्याप्रमाणे याहवेहने अमोर्‍यांचे राजे सीहोन आणि ओगचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा ते नाश करतील.
याहवेह त्यांना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्याशी ते सर्व करावे ज्याची आज्ञा मी तुम्हाला दिलेली आहे.
खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही.”
मग मोशेने यहोशुआला बोलाविले आणि सर्व इस्राएली लोकांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर हो आणि हिंमत धर, कारण या लोकांच्या पूर्वजांना याहवेहने वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तू त्यांच्यासह जावे आणि ती भूमी त्यांचे वतन म्हणून त्यांना विभागून द्यावी.
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options