Skip to content
अनुवाद ३:१-७

अनुवाद ३:१-७

मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.
याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”
याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही.
त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही.
या सर्व शहरांच्या तटबंदी उंच व दरवाजे लोखंडी गजांचे होते. शिवाय बरीच तटबंदी नसलेली गावेही होती.
ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला.
पण त्यांची सर्व गुरे व शहरातून मिळालेली लूट आपण आपल्यासाठी नेली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options