Skip to content
दानीएल १०:२०-२१

प्रकटीकरणाचा उद्देश आणि भावी संघर्ष

दानीएल १०:२०-२१

प्रकटीकरणाचा उद्देश आणि भावी संघर्ष

२०
तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? फार लवकर, मी पर्शियाच्या राजपुत्राशी लढायला परत येईन आणि मी निघून गेल्यावर ग्रीसचा राजपुत्र येईल;
२१
परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • दानीएल १०:१३

    परंतु पर्शिया राज्याच्या राजपुत्राने माझी वाट एकवीस दिवस अडविली. नंतर मिखाएल, स्वर्गातील राजपुत्रांपैकी एक, माझ्या साहाय्यासाठी आला, कारण पर्शियाच्या राजाकडे मला अडविण्यात आले होते.
    वचन २० मधून
  • दानीएल १२:१

    “त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल.
    वचन २१ मधून
  • प्रकटीकरण १२:७

    मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले.
    वचन २१ मधून
  • दानीएल ८:२१

    तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.
    वचन २० मधून
  • यहूदा १:९

    परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”
    वचन २१ मधून
  • दानीएल ८:५

    जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.
    वचन २० मधून
  • दानीएल ८:८

    तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.
    वचन २० मधून
  • दानीएल ११:२

    “आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्‍या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.
    वचन २० मधून
  • दानीएल ११:४

    त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.
    वचन २० मधून
  • प्रेषित १२:२३

    हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला.
    वचन २० मधून
  • दानीएल ७:६

    “यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.
    वचन २० मधून
  • यशायाह ३७:३६

    त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.
    वचन २० मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options