मुख्य मजकुरावर जा
2 राजे ६:८-१४

अलीशा अरामाच्या युद्धयोजना उघड करतो

2 राजे ६:८-१४
त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.”
परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.”
१०
परमेश्वराच्या मनुष्याने सांगितलेले ठिकाण इस्राएलच्या राजाने पडताळून पाहिले. अलीशाने राजाला वारंवार सावध केले, जेणेकरून तो अशा ठिकाणी सावध राहिला.
११
तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्‍यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?”
१२
तेव्हा एका अधिकार्‍याने म्हटले, “माझे स्वामी महाराज, आपल्यापैकी कोणीही नाही, परंतु इस्राएलमधील अलीशा जो संदेष्टा, तो इस्राएलाच्या राजाला तुम्ही तुमच्या विश्रांतिगृहात उच्चारलेले प्रत्येक शब्द कळवितो.”
१३
राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.”
१४
मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options