Skip to content
2 राजे ६:१-७

2 राजे ६:१-७

संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे.
चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.” आणि तो म्हणाला, “जा.”
त्यापैकी एकाने म्हटले, “कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?” अलीशाने उत्तर दिले, “मी तुमच्याबरोबर येतो.”
आणि तो त्यांच्यासोबत गेला. ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले.
त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्‍हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्‍हाड उसनी मागून आणली होती!”
परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्‍हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले.
तो म्हणाला, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options