Skip to content
2 राजे १९:२७-३७

2 राजे १९:२७-३७

२७
“ ‘परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस.
२८
कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.’
२९
“हिज्कीयाह, तुझ्यासाठी हे चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.
३०
पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल.
३१
यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल.
३२
“म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “ ‘तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.
३३
ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही, असे याहवेह घोषित करतात.
३४
माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ”
३५
त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.
३६
म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.
३७
एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options