मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास ८:१२-१६

मंदिरातील उपासना व व्यवस्था प्रस्थापित

2 इतिहास ८:१२-१६
१२
याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले,
१३
शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण.
१४
त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.
१५
राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत.
१६
ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options