Skip to content
2 इतिहास २६:१-८

2 इतिहास २६:१-८

तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले.
अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता.
उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.
तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.
परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्‍या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली.
अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options