Skip to content
2 इतिहास २५:२३-२८

2 इतिहास २५:२३-२८

२३
इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.
२४
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला.
२५
इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र योआश याच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा अमस्याह पंधरा वर्षे जगला.
२६
अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय?
२७
अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.
२८
त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options