मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास १६:१-६

आसा इस्राएलविरुद्ध अरामावर विसंबतो

2 इतिहास १६:१-६
आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.
त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.
आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली.
बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले.
नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options