Skip to content
2 इतिहास १५:१६-१९

2 इतिहास १५:१६-१९

१६
आसा राजाने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडून फोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली.
१७
जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.
१८
त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणले.
१९
आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत लढाई झाली नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options