2 इतिहास १६:७-१०
७
त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.
८
कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले.
९
कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”
१०
यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.
Settings