2 इतिहास १२:११-१४
११
जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.
१२
रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते.
१३
रेहोबोअम राजाने स्वतःला यरुशलेममध्ये स्थिर केले आणि राजा म्हणून राहिला. त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.
१४
त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते.
Settings