Skip to content
2 इतिहास १२:९-१२

शीशक यरुशलेम लुटतो

2 इतिहास १२:९-१२
इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.
१०
म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या.
११
जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.
१२
रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options