मुख्य मजकुरावर जा
1 राजे १५:२५-३१

नादाबाची इस्राएलवरील अल्प कारकीर्द

1 राजे १५:२५-३१
२५
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
२६
याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपल्या पित्याचे अनुसरण करीत, त्याच्या पित्याने इस्राएली लोकांना जी पापे करण्यास लावले होते, त्याच मार्गाला तो लागला.
२७
इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले.
२८
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.
२९
त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.
३०
जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले.
३१
नादाबच्या राज्याच्या इतर घटना, आणि जे सर्वकाही त्याने केले ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options