मुख्य मजकुरावर जा
1 राजे १४:२५-३१

शीशक यरुशलेमवर स्वारी करतो

1 राजे १४:२५-३१
२५
रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, इजिप्तचा राजा शिशाकने यरुशलेमवर हल्ला केला.
२६
त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.
२७
म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या.
२८
जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.
२९
रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही?
३०
रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.
३१
रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह राजा म्हणून त्याचा वारस झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options