Skip to content
1 करिंथकरांस १४:२६-३३

1 करिंथकरांस १४:२६-३३

२६
मग बंधूंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल.
२७
कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि दुसरा अर्थ सांगेल.
२८
पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्‍यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
२९
संदेश देणार्‍यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी.
३०
बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्‍यांनी शांत व्हावे.
३१
ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल.
३२
संदेश देणार्‍याचे आत्मे संदेश देणार्‍यांच्या नियंत्रणात असतात.
३३
कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options