1 करिंथकरांस १४:२०-२५
२०
प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा.
२१
नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे: “अन्य भाषा बोलणारे परक्यांच्या ओठांद्वारे मी या लोकांशी बोलेल, परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत. असे प्रभू म्हणतात.”
२२
अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्यांसाठी नाही.
२३
तरीपण चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य तुमच्या मंडळीत आला आणि त्याने तुम्हा सर्वांना अन्य भाषेतून बोलताना ऐकले, तर तुम्ही सर्वजण वेडे आहात असेच त्याला वाटेल.
२४
परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील.
२५
त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.
Settings