Skip to content
1 इतिहास ६:५४-८१

1 इतिहास ६:५४-८१

५४
हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):
५५
यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.
५६
पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.
५७
अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
५८
हीलेन, दबीर,
५९
आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
६०
बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह.
६१
अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली.
६२
गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.
६३
मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.
६४
इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली.
६५
त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.
६६
एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:
६७
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
६८
योकमेअम, बेथ-होरोन,
६९
अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.
७०
तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.
७१
गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह;
७२
इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ,
७३
रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;
७४
आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
७५
हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;
७६
नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.
७७
लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;
७८
यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,
७९
केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली;
८०
आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
८१
हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options