Zilpah बद्दल बायबलमधील वचने: Mother of Gad and Asher by Jacob
Mother of Gad and Asher by Jacob बद्दल वचने
आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली.
याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला.
लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद असे ठेवले.
लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला.
लेआने त्याचे नाव आशेर ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”
लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते.
याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या.
हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.