मुख्य मजकुरावर जा

Witness बद्दल बायबलमधील वचने: Qualified by oath

5 वचने · 10 पैलू

Qualified by oath बद्दल वचने

  1. तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.

  2. मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो.

  3. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  4. “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील,

  5. तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.