Skip to content

Wave Offering बद्दल बायबलमधील वचने

30 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल.

  2. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  3. याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा.

  4. “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्‍हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी.

  5. हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.