मुख्य मजकुरावर जा

Wave Offering बद्दल बायबलमधील वचने: Was given to the priest as his due

9 वचने · 12 पैलू

Was given to the priest as his due बद्दल वचने

  1. मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.

  2. “समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर.

  3. हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.

  4. मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल.

  5. कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा.

  6. मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

  7. मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.”

  8. याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल.

  9. हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.