Twins बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले.
पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले.
त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”
परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले.