Skip to content

Turtle Dove बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले.

  2. परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले.

  3. आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले.

  4. संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे.

  5. “ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी.

  6. याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे.

  7. त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी.

  8. तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  9. परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.

  10. त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये.

  11. नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.

  12. दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.