Timothy बद्दल बायबलमधील वचने: Reputation and Christian faith of
Reputation and Christian faith of बद्दल वचने
लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते.
या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल.
तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभूचे सेवाकार्य करीत आहे.
तुझी आई युनीके आणि तुझी आजी लोईस यांचा प्रभूवर जितका दृढविश्वास आहे आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.