Skip to content

Thunder बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.

  2. हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”

  3. तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.

  4. परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”

  5. चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली.

  6. सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.

  7. जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),

  8. पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.

  9. तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.