मुख्य मजकुरावर जा

The Owl बद्दल बायबलमधील वचने: Inhabits deserted cities and houses

6 वचने · 7 पैलू

"The Owl" साठी शोधा

Inhabits deserted cities and houses बद्दल वचने

  1. परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, तरसानी तिची घरे भरून जातील; तिथे घुबडे राहतील, आणि तिथे बोकडे उड्या मारतील.

  2. ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.

  3. तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.

  4. काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

  5. वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; तिथे निशाचरही झोपतील आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील.

  6. “म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल.