Skip to content

Students बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा त्याने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, परंतु जेव्हा त्यांनी संदेष्ट्यांचा घोळका भविष्यवाणी करीत आणि शमुवेल त्यांचा पुढारी म्हणून तिथे उभा आहे असे पाहिले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा शौलाच्या माणसांवर आला आणि ते सुद्धा भविष्यवाणी करू लागले.

  2. याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला.

  3. एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.

  4. तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  5. तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

  6. संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला.

  7. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.

  8. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”