Steward बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?”
घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्याकडे गेले;
दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता.
हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत.